साडवली , संगमेश्वर येथे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' जोमाने राबवण्यात आले .
'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' हे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहन देऊन त्यांची कार्यक्षमता वाढवणे, ग्रामीण भागाचा शाश्वत विकास घडवून आणणे आणि गावांना स्वावलंबी बनवणे आहे.या अभियानात सुशासन, आर्थिक स्वावलंबन, जलसमृद्धी, स्वच्छता, हरित गाव, मनरेगा तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी अशा विविध घटकांवर भर दिला जातो. उत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य स्तरावर पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या पुरस्कारांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे.